"वेडात मराठे वीर दौडले सात"
Sarsenapati Prataprao Gujar आज आपण माहिती घेणार आहोत स्वराज्याचे तिसरे सरसेनापती म्हणजेच सरसेनापती सरनोबत "प्रतापराव गुजर" यांबद्दल , अपेक्षा आहे माहिती तुम्हाला नक्की आवडेल . कुडतोजी गुजर यांच्या गावात मुघलांचे अत्याचार वाढत होते. कुडतोजींना हे काही सहन होत नव्हते. अखेरीस त्यांनी लढा देण्याचे ठरवले. मुघलांविरोधात लढा देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याचे मुख्य उद्धिष्ट म्हणजे गावातील स्त्रियांचे रक्षण करणे. प्राण्यांचे रक्षण करणे आणि मुघलांना विरोध करणे. हाच त्यांचा मुख्य कार्यक्रम असे. एकदा मुघलांच्या खनिज्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी हल्ला केला. शिकार झाली. ते दोन वाघ म्हणजेच खुद्द "छत्रपती शिवाजी महाराज" आणि दुसरे वाघ म्हणजेच "कुडतोजी गुजर". छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुडतोजी गुजर यांना स्वराज्याचा विचार सांगितला. कुडतोजीराव खुश झाले. त्यांनी हसत हसत महाराजांना होकार दिला. कुडतोजीराव एकदा रागाच्या भरात आपल्या घरादाराची पर्वा न करता मुर्झाराजे यावर चालून गेले. कुडतोजीरावांची निडरता बघून मिर्झाराजे म्हणतो "आमच्या सोबत आपण सामील होऊन जावा पा...